औरंगाबाद प्रतिनिधी । राज्य विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजर मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठाने दिले आहेत.
धनंजय मुंडे यांनी १९९१मध्ये जगमित्र शुगर फॅक्ट्रीसाठी २४ एकर जमीन खरेदी केली होती. ही जमीन देवस्थानाची असल्यामुळे याबाबत बर्दापूर पोलिस ठाण्यात राजाभाऊ फड यांनी तक्रार दिली होते. पोलिसांनी याची दखल न घेतल्यामुळे फड यांनी औरंगाबाद खंडपीठात फौजदारी याचिका दाखल केली होती. ही सरकारी जमीन आहे. त्यामुळे ती ट्रस्ट्र किंवा खासगी व्यक्तीला विकत घेता येत नाही, असा आक्षेप फड यांनी घेतला होता. त्यामुळे मुंडेयांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी विनंती याचिकेत केली होती. ही विनंती कोर्टाने मान्य केली आहे. यामुळे आता धनंजय मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल होणार आहे.
दरम्यान, धनंजय मुंडे यांचे वकील सिध्देश्वर ठोंबरे यांनी आपण खंडपिठाच्या निकालाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती दिली आहे.