चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव तालुक्यातील रांजणगाव येथे नळाचे पाणी भरण्याच्या कारणावरून एका तरूणासह त्याच्या पत्नीला मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना गुरूवार ६ जून रोजी सकाळी ८ वाजता घडली आहे. याप्रकरणी दुपारी ४ वाता चाळीसगाव ग्रामीण पोलीसात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत अधिक असे की, चाळीसगव तालुक्यातील रांजणगाव येथे मार्तंड मल्हारी मोरे वय ३५ हा तरूण आपल्या पत्नी अलकाबाई यांच्यासोबत वास्तव्याला आहे. गुरूवार ६ जून रोजी सकाळी ८ वाजता नळाचे पाणी भरण्याच्या कारणावरून मार्तंड मोरे व त्यांची पत्नी अलकाबाई मोरे यांना गावात राहणारे गोपाळ रामकृष्ण मोरे, शंकर रामकृष्ण मोरे आणि सुनंदाबाई रामकृष्ण मोरे यांनी शिवीगाळ करत मारहाण केली. या मारहाणीत पती-पत्नी हे जखमी झाले. याप्रकरणी दुपारी ४ वाजता चाळीसगाव ग्रामीण पोलीसात तक्रार देण्यात आली. त्यानुसार गोपाळा रामकृष्ण मोरे, शंकर रामकृष्ण मोरे आणि सुनंदाबाई रामकृष्ण मोरे तिघे रा. रांजणगाव ता.चाळीसगाव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि राजेंद्र साळुंखे हे करीत आहे.