चाळीसगाव न.पा.तील भ्रष्टाचाराला कंटाळून नगरसेवक घृष्णेश्वर पाटील यांचा राजीनामा (व्हिडीओ)

grushneshwer patil

चाळीसगाव, प्रतिनिधी | येथील नगर पालिकेच्या प्रभाग क्र.१ चे लोकप्रतिनिधी असलेल्या नगर सेवक घृष्णेश्वर रामकृष्ण पाटील यांनी पालिकेतील भ्रष्ट आणि मनमानी कारभाराला कंटाळून आपल्या पदाचा राजीनामा देत असल्याची माहीती आज (दि.४) एका पत्रकाद्वारे कळवली आहे.

 

या पत्रकात म्हटले आहे की, नगर पालिकेत विरोधी पक्षातील एकाच परिवाराच्या दबावामुळे अनेक गैरव्यवहार केले जात असून त्यात परवानगी न घेता व्यापारी संकुलाचे बांधकाम करणे, कमी किमतीच्या वस्तू ज्यादा किमतीत खरेदी करणे, प्रभागातील समस्यांबद्दल वारंवार दाद मागूनही दुर्लक्ष करणे, ठेकेदाराचा कर्मचाऱ्यांवर असलेला दबाव, कामांच्या नियोजनाचा अभाव, विकास कामांकडे जाणीवपूर्वक केलेले दुर्लक्ष, विकासासाठी आलेल्या मोठ्या निधीचे काय झाले याबाबत साशंकता, अशा अनेक गैर प्रकारांना कंटाळून आपण राजीनामा देत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मात्र पुढील काळात पदावर नसलो तरी जनतेच्या वतीने भ्रष्टाचार व चुकीच्या प्रवृत्ती विरोधात आपला संघर्ष सुरूच ठेवणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

 

 

Protected Content