Home Cities जळगाव नगरसेवक दत्तात्रय कोळी यांचे निधन : आज सायंकाळी अंत्यसंस्कार

नगरसेवक दत्तात्रय कोळी यांचे निधन : आज सायंकाळी अंत्यसंस्कार


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगाव महापालिकेचे जेष्ठ नगरसेवक दत्तात्रय उर्फ दत्तूभाऊ देवराम कोळी यांचे आज अकस्मात निधन झाले असून त्यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

दत्तूभाऊ देवराम कोळी यांनी आज सकाळी १० वाजून ४० मिनिटांनी शेवटचा श्‍वास घेतला. त्यांच्या निधनाची माहिती मिळताच राजकीय आणि सामाजिक वर्तुळातून शोक संवेदना व्यक्त करण्यात येत आहेत. त्यांची अंत्ययात्रा महावीर नगर घरकुल येथील राहत्या घरापासून आज संध्याकाळी ५ वाजता नेरीनाका येथील वैकुंठ धाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.


Protected Content

Play sound