Home आरोग्य ऐनपुरात पुन्हा कोरोनाची एंट्री : बीडीओंकडून सक्तीच्या सूचना

ऐनपुरात पुन्हा कोरोनाची एंट्री : बीडीओंकडून सक्तीच्या सूचना

0
31

रावेर प्रतिनिधी । तालुक्याती ऐनपुर येथे ग्राम पंचायतचे दोन उमेदवार कोरोना पॉझिटिव्ह निघाल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणुन गट विकास अधिकारी दिपाली कोतवाल यांनी तालुक्यात सर्व ग्रामसेवकांना सक्तीच्या सूचना दिल्या आहेत. 

तसेच ऐनपुर येथे पॉझिटीव्ह आलेल्या दोन्ही उमेदवारचे घराजवळ कंन्टमेंट झोन लावण्यात आले असून दोघे उमेदवार सद्या विलगीकरण कक्षात आहे. त्यांच्या संपर्कात कोण-कोण मतदार आले आहे. याचा शोध घेण्याचे काम सुरु झाले आहे. तसेच आज गट विकास अधिकारी दिपाली कोतवाल यांनी तालुक्यातील सर्व ग्राम सेवकांना कोरोना व्हायरस संदर्भात खबरदारी घेण्याचे अवाहन केले आहे. आगामी निवडणूकांमध्ये गर्दी करू नका, गावात प्रत्येकांनी मास वापरणे बंधनकारक करण्यात आले असुन तसे खबरदारी घेण्याचे सक्तीच्या सूचना आज गट विकास अधिकारी दिपाली कोतवाल यांनी तालुक्यातील सर्व ग्राम सेवकांना काढले आहे.

 


Protected Content

Play sound