फैजपूरात ब्रम्हलीन जगन्नाथ महाराज पुण्यतिथी महोत्सवाचे आयोजन

फैजपूर प्रतिनिधी । सतपंथ मंदिर संस्थानचे ११ वे गादीपती ब्रह्मलीन संत जगन्नाथ महाराज यांचा पुण्यतिथी महोत्सव १३ व १४ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आले असून सतपंथाचे जगद्गुरु ज्ञानेश्वरदास महाराज यांच्या उपस्थितीत सोहळा पार पडणार आहे.

या कार्यक्रमाचे प्रमुख म्हणून प्रेरणापीठ पीराणा येथील पप्पू अनंत विभूषित श्रीमद् जगद्गुरु सत्पंथाचार्य ज्ञानेश्वरदास महाराज यांचे महाराष्ट्राच्या पवित्र भूमीत प्रथमच आगमन होत असल्याने कार्यक्रमाची शोभा वाढणार आहे. याप्रसंगी स्वामीनारायण पंथाचे शास्त्री धर्मप्रसादजी महाराज वडताल, प.पू. गोपाल चैतन्य महाराज वृंदावन धाम पाल, खंडोबा देवस्थानचे गादीपती महामंडलेश्वर पुरुषोत्तमदास महाराज, महानुभाव पंथाचे प.पू. मानेकर बाबा शास्त्री दत्त मंदिर सावदा, भक्तीकिशोरदास स्वामीनारायण गुरुकुल सावदा, योगाचार्य प्रेमदास बापू अमेरिका, श्रद्धेय कृष्णगिरी महाराज सोमवार गिरी मढी सावद्याचे, प.पू. श्याम चैतन्य  गुरुदेव सेवा आश्रम जामनेर, स्वरूपानंदजी महाराज क्षेत्र डोंगरदे, प.पू. भरत महाराज श्रीराम मंदिर कुसुंबा, आदिशक्ती मुक्ताई संस्थांचे ह.भ.प. रवींद्र महाराज हरणे, ब्रह्मकुमारी शकुंतला दीदी, ह.भ.प धनराज महाराज अंजाळे, कन्हैया महाराज आमोदे, सतपंथ  परिवार महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश या  सर्वांच्या उपस्थिती लाभणार आहे.

दि. १३ रोजी संध्याकाळी ५ ते ७ ब्र. जगन्नाथजी महाराज यांची पुण्यतिथी महापूजा, दि. १४ डिसेंबर मंगळवारी सकाळी  ७-३० ते ८-३० पूर्वाचार्य समाधी पूजन, सकाळी ९ ते ११-३० संतांचे अमृत वचन व सत्पंथ दिनदर्शिका २०२२  चे प्रकाशन , सतपंथ उटासन महापूजा पुस्तकाचे प्रकाशन असा कार्यक्रम शुभ दिव्य मंगल कार्यालय फैजपुर बस स्टँड समोर होणार आहे. कोरोनाच्या नियमांचे पालन करून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज यांनी केले आहे.

Protected Content