आर्या फाऊंडेशनतर्फे कोरोना योद्ध्यांचा सन्मान

जळगाव प्रतिनिधी । कोरोना काळात उल्लेखनिय कामगिरी करणारे  डॉक्टरसह नर्सेस यांच्यासह इतर कोरोना योध्दांचा शहरातील आर्या फाऊंडेशनतर्फे गौरव करण्यात आला.

जळगाव गेल्या सहा-सात महिन्यांपासून जीवाचे रान करत कोरोना या विषाणू विरुद्ध जळगाव शहरातील शासकीय यंत्रणेमधील डॉक्टर्स, नर्सेस अहोरात्र लढा देत आहेत. त्यातील अनेक डॉक्टर्स ,नर्सेस यांना कोरोना या विषाणू ने जखडले ,परंतु त्याला न जुमानता ही मंडळी औषोधोपचारानंतर पुन्हा या विषाणूशी दोन हात करण्यास सज्ज झालेल्या  अधिष्ठाता डॉ.जयप्रकाश रामानंद, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.एस.एन. चव्हाण यांच्यासह 25 डॉक्टरांचा गौरव आर्या फाऊंडेशनतर्फे करण्यात आला.

 आर्या फाऊंडेशतर्फे  शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव येथे सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता.  यावेळी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद ,सिव्हिल सर्जन डॉ.एन. एस.चव्हाण, डॉ.मारोती पोटे यांना आर्या फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.धर्मेंद्र पाटील यांनी सन्मानपत्र देवून गौरव केला. तसेच संस्थेच्यावतीने अधिष्ठाता डॉ.जयप्रकाश रामानंद यांचे हस्ते डॉ.विजय गायकवाड ,डॉ.शैला पुराणिक,डॉ.अंजली वासाडीकर, डॉ.इम्रान तेली, डॉ.किशोर इंगोले, डॉ.इम्रान पठाण , डॉ.अक्षय सरोदे, डॉ.आर.एच.अग्रवाल आदी 25 डॉक्टरांना सन्मानपत्र देत गौरव करण्यात आला. प्रास्ताविक डॉ.धर्मेंद्र पाटील यांनी केले. याप्रसंगी संस्थेचे सचिव डॉ.राहुल महाले,रोशन शहा आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कर्मचारी वृंद उपस्थित होते.

 

Protected Content