यावल प्रतिनिधी । तालुक्यातील मौजे राजोरा येथे कोविड-१९ लसीची १०० टक्के लसीकरण करण्यात झाले असून ग्रामपंचायतीला खासदार रक्षाताई खडसे यांनी भेट देऊन अशक्य काम पूर्ण काम करण्यात मोलाचा वाटा उचलणाऱ्या ग्रामपंचायत पदाधिकारी, कर्मचारी, आरोग्यदुत, आशा स्वयंसेविका आणि कोरोना योद्धे यांचा सत्कार केला आहे.
सदर भेटीत रक्षाताई खडसे यांनी आपल्या भाषणात सांगितले की सुरवातीला कोविडची लस आली होती तेव्हा नागरिकांमध्ये बऱ्याच अफवा पसरविण्यात आल्या होत्या, त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक लसीकरण करण्यात घाबरत होते. परंतु सदर गावात लसीकरणासाठी पुढे येऊन हे अश्यक्यप्राय काम पूर्णत्वास आले, संपूर्ण कोविड योद्धे, वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी, आशा वर्कर, अंगणवाडी कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते यांच्यासह ग्रा.प. पदाधिकारी यांनी खूप मेहनत घेतली. या मेहनतीला पाहून गावकर्यांनी सुद्धा सहकार्य करून कोरोना सारख्या महामारीला गावातून हद्दपार करण्याचा निश्चय करून पुढे आले, तेव्हा कुठे हे शक्य झाले.
तसेच जळगांव जिल्ह्याच्या इतर गावातील ग्रामस्थांनी सुद्धा सदर राजोरा येथील ग्रामस्थांचा आदर्श घेऊन बिना घाबरता लवकरात लवकर लसिकरण करावे, तसेच कुटुंबातील किंवा आपल्या शेजारील एकही लसीकरण पासून वंचित राहणार नाही याची नोंद घ्यावी असे आव्हाहन केले. राजोरा येथील सुज्ञ नागरीकांसारख्याच असंख्य नागरिकांमुळे आज देशात जवळ जवळ ६० कोटी पेक्षा जास्त लोकांचे लसीकरण झालेले असून याबाबतीत आपला देश सर्वात पुढे आहे. असे खासदार रक्षाताई खडसे यांनी सांगतांना गावकऱ्यांना प्रोत्साहित केले.
यावेळी भाजपा यावल प.स सभापती पल्लवीताई चौधरी यावल तालुकाध्यक्ष उमेश फेगडे, शहराध्यक्ष निलेश गडे, जि.प.सदस्य सविता भालेराव, सरपंच पुष्पा पाटील, उपसरपंच दिनेश पाटील, सरपंच संघटना जिल्हा अध्यक्ष पुरजित चौधरी, पोलीस पाटील मुक्ताबाई गोसावी, यावल भाजपा तालुका सरचिटणीस उज्जैनसिंग राजपूत, भाजयुमो तालुकाध्यक्ष सागर कोळी, भाजयुमो तालुका सरचिटणीस व्यंकटेश बारी, भाजपा शाखा अध्यक्ष कल्पेश पाटील, मधुकर नारखेडे, उल्हास पाटील, हिरामण पाटील, युवराज पाटील यांच्यासह डॉ. झाकीर हुसेन, डॉ हेमंत बऱ्हाटे, ग्रामसेवक प्रवीण चौधरी, आरोग्य सेवक अल्ताफ देशपांडे व समस्त ग्रा.प.सदस्य, गावकरी व कार्यकर्ते उपस्थित होते.