बामणोद येथे कोरोना योद्धांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील बामणोद येथील ग्रामपंचायतीत करोना योद्धा प्रमाणपत्र वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी अनेकांची उपस्थिती होती.

फैजपूर येथील सामाजिक कार्यकर्ते भरत महाजन यांच्या हस्ते यांच्याहस्ते कोरोना योध्दांचा गौरव करण्यात आला. अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, आरोग्यसेवक, ग्रामपंचायत सदस्य, पाडळसा-भालोद गटातील आशावर्कर व बामणोद-आमोदा गणातील आशा वर्कर यांना गौरवण्यात आले.

कोरोनाच्या कार्यकाळात सामाजिक बांधिलकी जपून, वेळप्रसंगी आपला जीव धोक्यात घालून ही मंडळी निस्वार्थपणे कार्य करीत असल्याबद्दल मान्यवरांनी आनंद व्यक्त करीत त्यांचे कौतुक केले. सोशल डिष्टन्सिंग पाळत, मास्कचा वापर करीत कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला गंपाभाऊ ढाके, तुषार जावळे, डॉ. नरेंद्र भोळे, दिलीप भालेराव, प्रफुल्ल भोळे यांची विशेष उपस्थिती होती.

Protected Content