दहिगाव येथे कोरोना लसीकरणास प्रारंभ

यावल प्रतिनिधी ।  सावखेडासिम प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. गौरव भोईटे व डॉ. नसीमा तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली उपकेंद्र स्तरावर दहिगाव येथे कोरोना लसीकरणास आज प्रारंभ करण्यात आला.

कोरोना विषाणू संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर तालुक्यात व जिल्ह्यात टप्प्या टप्प्याने लस उपलब्ध होत असल्याने पुन्हा ४५ वर्षावरील कोरोना लसीकरणास गती मिळताना दिसत आहे. ४५ वर्षावरील ४० नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक कोवीशील्ड लसीचे डोस देण्यात आले. स्पॅाट रजिस्ट्रेशन अरविंद जाधव यांनी केले.

दहिगाव येथील आदर्श विद्यालयातील परिसरात पार पडलेल्या या लसीकरण शुभारंभ शिबीराप्रसंगी सरपंच अजय अडकमोल, उपसरपंच किशोर महाजन , माजी जिल्हा परिषद शिक्षण समिती  सभापती सुरेशआबा पाटील ,पोलीस पाटील संतोष पाटील, मुख्याध्यापक शालीक चौधरी, डॉ. प्रवीण ठाकरे, आरोग्य सहाय्यक एल. जी. तडवी, राजेंद्र बारी, अरविंद जाधव, ग्रामसेवक योगेंद्र अहिरे व आरोग्य सेविका अनिता महाजन आदी मान्यवर ग्रामस्थ मंडळी उपस्थित होती .

यावेळी लसीकरणाचा दुसरा डोस असलेल्या नागरिकांना प्राधान्य देण्यात आले.

लसीकरण झाल्यावर आपल्याला एक मेसेज प्राप्त होईल सोबत लिंक असेल त्या लिंक वरून आपले लसीकरणाचे प्रमाणपत्र डाऊनलोड करून ते जतन करून ठेवावे. असे डॉ. नसीमा तडवी यांनी सांगितले. तर लस घेतल्यानंतर देखील नागरिकांनी नियमित मास वापरावा. व सामाजिक अंतर ठेवावे असे आवहान डॉ. गौरव भोईटे यांनी केले.

या लसीकरण शिबिरास आशा सेविका नीता महाजन, अर्चना अडकमोल, भाग्यश्री महाजन, पुष्पा पाटील, संध्या बाविस्कर व चंद्रकला चौधरी तसेच आदर्श विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक वृंद, स्टॉप व ग्रामपंचायत यांचे पारिश्रम व सहकार्य लाभले.

 

Protected Content