कोरोना : जिल्ह्यात आज एकही बाधित रुग्ण नाही

जळगाव प्रतिनिधी | जळगाव जिल्हा रुग्णालयाने पाठवलेल्या कोरोना अहवालात आज दिवसभरात एकही रुग्ण आढळून आला नाही. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे

जळगाव जिल्हा आज पाठवलेल्या कोरोना अहवालात नमूद केल्याप्रमाणे दिवसभरात एकही रुग्ण आढळून आला नाही. जिल्ह्यात आज ९ अॅक्टीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १ लाख ४२ हजार ८१७ रुग्ण बाधित आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४० हजार २२९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत २ हजार ५७९ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे.

Protected Content