भुसावळच्या डीआरएम कार्यालयात कोरोना सुसाट

भुसावळ प्रतिनिधी । भुसावळ रेल्वे मंडल कार्यालयात पाचशे कर्मचारी काम करत असून, यापैकी 256 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

शहरामध्ये कोरोनाचे रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत असताना आता रेल्वे कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण मोठ्या प्रमाणात झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. येथील डीआरएम कार्यालयातील विविध विभागातील दररोज एक ते दोन कर्मचारी यांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह येत आहे. याच पार्श्वभुमीवर डीआरएम विवेककुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली डीआरएम कार्यालयातील आतील प्रवेशद्वाराजवळ कर्मचार्‍यांची स्वॅब तपासणी करण्यात आली. 

या तपासणीत 256 कर्मचार्‍यांचे अहवाल पॉझीटीव्ह आले आहे. यामुळे डीआरएम कार्यालयातील कर्मचार्‍यांमध्ये खळबळ उडाली. 256 पैकी 86 कर्मचारी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असून उर्वरित कर्मचारी होम क्वारंटईन आहेत. तीन ते चार दिवस दररोज डीआरएम कार्यालयात स्वॅब तपासणी मोहिम राबविली जाणार आहे. यामुळे डीआरएम कार्यालयात सर्वच कर्मचार्‍यांची कोरोना चाचणी घेतली जाणार आहे. कर्मचार्‍यांसोबत अधिकारी, वरिष्ठ अधिकारी यांचीही तपासणी केली जाणार आहे.

 

Protected Content