जळगाव प्रतिनिधी | जळगाव जिल्हा रुग्णालयाने पाठवलेल्या कोरोना अहवालात आज दिवसभरात एकूण ६ कोरोना रुग्ण आढळून आले तर तीनजण बरे झाले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे
जळगाव जिल्हा आज पाठवलेल्या कोरोना अहवालात नमूद केल्याप्रमाणे दिवसभरात एकूण ६ नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. या नऊ रुग्णांपैकी शहरातील ४, तर मुक्ताईनगर येथील २ रुग्ण आहेत. तर ३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
जिल्ह्यात आज २० अॅक्टीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १ लाख ४२ हजार ८33 रुग्ण बाधित आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४० हजार २३४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत २ हजार ५७९ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे.