यावल महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण शिबिर

यावल प्रतिनिधी । येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाजाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना, विद्यार्थी विकास विभाग व ग्रामीण रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २५ ऑक्टोंबर ते २ नोव्हेंबर २०२१ पर्यंत मिशन युवा स्वास्थ अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू केली आहे.

लसीकरण शिबिराचे उद्घाटन दिनांक २७ ऑक्टोंबर रोजी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बी.बी. बारेला यांनी केले असून त्यांनी प्रतिपादन केले की, युवा पिढी निरोगी व स्वस्थ राहण्यासाठी हे मिशन राबविण्यात येत आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्ष प्राचार्य डॉ. संध्या सोनवणे यांनी मार्गदर्शन केले की प्रतिकार क्षमता वाढविणे व कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी लसीकरण गरजेचे आहे. लसीकरण या संदर्भातील लोकांमधील गैरसमज दूर करण्यासाठी विद्यार्थ्यांनी पुढाकार घ्यावा. या शिबिरात ४४ विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले यासाठी ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. शुभम तिडके, परिचारिका रुपाली बाविस्कर, डाटा ऑपरेटर अमित तडवी ,अझरुदुद्दीन तडवी ,अमिन तडवी यांचे सहकार्य मिळाले .

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुधा खराटे यांनी केले तर आभार प्रा. आर .डी .पवार यांनी मानले .शिबिर यशस्वी करण्यासाठी उपप्राचार्य प्रा. ए पी .पाटील ,प्रा.  एम .डी . खैरनार,  संजय पाटील ,प्रा . एस .आर. गायकवाड ,डॉ. एस .पी. कापडे  , मिलिंद बोरघडे,  कनिष्ठ विभागातील सर्व शिक्षक व  सर्व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.

 

Protected Content