ब्रेकींग : राज्यात रात्रीची संचारबंदी – जाणून घ्या नवीन नियमावली !

मुंबई प्रतिनिधी | कोरोनाचा वाढता प्रकोप लक्षात घेऊन राज्य सरकारने नवीन नियमावली जाहीर केली असून यात रात्रीची संचारबंदी लावण्यात आलेली आहे. तसेच यात शाळा बंदीसह इतरही नियम लादण्यात आले आहेत. जाणून घ्या याबाबतची माहिती.

सविस्तर वृत्त खालील लिंकवर क्लिक करून वाचा

राज्यात कोरोनाच्या रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढीस लागली आहे. यामुळे पुन्हा एकदा लॉकडाऊन लागणार का ? हा प्रश्‍न वारंवार विचारण्यात येत आहे. यावर उत्तर देतांना राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लॉकडाऊन नव्हे तर कडक निर्बंध लावण्यात येतील असे सांगितले होते. विशेष करून रात्रीची संचारबंदी लावण्याचे सूतोवाच त्यांनी केले होते. त्यांनी केलेल्या शिफारसी या मुख्यमंत्र्यांकडे पाठविण्यात आल्या होत्या. यानंतर आज सायंकाळी राज्य सरकारने नवीन नियमावली जाहीर केली आहे.

या नियमावलीनुसार, उद्या मध्यरात्रीपासून राज्यात रात्रीची संचारबंदी लागू असणार आहे. त्याचबरोबर शाळा, महाविद्यालये, मॉल, शॉपिंग मॉल, मैदानं, उद्याने, चित्रपट गृहे, केशकर्तनालय, सरकारी आणि खासगी कार्यालये आदींसाठी ही नियमावली लागू करण्यात आली आहे. तर, मुंबई लोकल प्रवासासाठी कुठलेही निर्बंध लावण्यात आलेले नाहीत. अन्य प्रवासांवर देखील निर्बध लावण्यात आलेले नाहीत.

रात्री ११ ते सकाळी ५ या कालावधीत संचारबंदी राहणार

राज्यात आता दिवसा जमावबंदी लागू करण्यात आली आहे. दिवसा पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येता येणार नाही.

अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडण्यास निर्बंध

लग्न समारंभासाठी 50 जणांना परवानगी

अंत्यविधी आणि अंत्यसंस्कारासाठी 20 जणांना परवानगी

सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि राजकीय कार्यक्रमासाठी 50 जणांना परवानगी

15 फेब्रुवारीपर्यंत शाळा आणि कॉलेज बंद. मात्र 10 वी, 12वीचे वर्ग सुरु राहणार. तसंच शाळेतील प्रशासकीय कामे सुरु राहणार.

स्विमिंग पूल, जीम, स्पा, वेलनेस सेंटर, ब्युटी पार्लर बंद

हेअर कटिंगची दुकानं 50 टक्के क्षमतेने सुरू, रात्री 10 ते सकाळी 7 पर्यंत बंद राहणार

पर्यटन स्थळं बंद, पार्क, प्राणी संग्रहालय, फोर्ट, म्युझियम, एन्टरटेन्मेंट पार्क पुढील आदेशापर्यंत बंद राहणार आहे

शॉपिंग मॉल आणि बाजार कॉम्पलेक्स 50 टक्के क्षमतेने सुरू

रेस्टॉरंट 50 टक्के क्षमतेने सुरू राहणार. रात्री 10 ते सकाळी 5 हॉटेल बंद राहणार आहे. होम डिलिव्हरी सुरु राहणार आहे

नाट्यगृह, सिनेमागृह 50 टक्के क्षमतेने सुरू राहणार आहे. क्षमता बोर्डावर प्रदर्शित करावी.

नाट्यगृह, सिनेमागृहात संपूर्ण लसीकरण झालेल्यांनाच परवानगी मात्र रात्री 10 ते सकाळी 8 सिनेमागृह बंद

सरकारी कार्यालयात भेटणाऱ्यांना निषेध, आवश्यकता असल्यासच मुख्य कार्यालयाची लेखी परवानगी आवश्यक

प्रायव्हेट ऑफिसेसमध्ये वर्क फ्रॉम होम, 50 टक्के पेक्षा अधिक जणांना परवानगी नाही

याशिवाय, या नियमावलीत इतर तरतुदी करण्यात आलेल्या आहेत.

Protected Content