जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्हा कोवीड रूग्णालयाने पाठविलेल्या कोरोना अहवालात आज दिवसभरात ४९४ रूग्ण आढळून आलेत. तर ५१२ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. जिल्ह्यात दिवसभरात १२ बाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्स डॉ.एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे.
आजची आकडेवारी
जळगाव शहर-४४, जळगाव ग्रामीण-१७, भुसावळ-७८, अमळनेर-१८, चोपडा-४९, पाचोरा-९, भडगाव-१, धरणगाव-२५, यावल-३३, एरंडोल-२२, जामनेर-३४, रावेर-३१, पारोळा-७, चाळीसगाव-४७, मुक्ताईनगर-४०, बोदवड-३७ आणि इतर जिल्ह्यातील २ असे एकुण ४९४ रूग्ण आढळले आहे.
जिल्ह्यात आजवर एकुण १ लाख ३६ हजार ७७९ बाधित रूग्ण आढळले आहे. त्यापेळी १ लाख २४ हजार ८५८ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. उर्वरित ९ हजार ४७१ रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. आज दिवसभरात १२ बाधित रूग्णांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविली आहे.