जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्हा रूग्णालयाने पाठविलेल्या कोरोना अहवालात आज जिल्ह्यात एकही बाधीत रूग्ण आढळला नाही. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्स डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे.
जळगाव जिल्ह्यात आज एकही बाधित रूग्ण आढळून आलेला नाही. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ४२ हजार ७८२ रूग्ण कोरोना बाधित आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४० हजार १९७ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर २ हजार ५७७ रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे.