कोरोनाचा संसर्ग वाढला; चाळीसगावात दोन दिवस बंद

चाळीसगाव प्रतिनिधी । एकीकडे जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग कमी होत असतांना चाळीसगाव तालुक्यातील रूग्णसंख्या वाढत असल्यामुळे शनिवार व रविवारी बंद पाळण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

मध्यंतरी चाळीसगावातील रूग्णसंख्या आटोक्यात आली होती. तथापि, आता गत काही दिवसांमध्ये पुन्हा पेशंट वाढू लागले आहेत. विशेष बाब म्हणजे आता जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग कमी झाला असतांना चाळीसगावात मात्र याच्या नेमक्या विरूध्द स्थिती आढळून येत आहे.

याची दखल घेऊन संसर्ग कमी करण्यासाठी प्रशासनाने उद्या आणि परवा म्हणजे शनिवार आणि रविवारी संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यात अत्यावश्यक सेवांचा अपवाद वगळता संपूर्ण बाजारपेठ पूर्णपणे बंद राहणार आहे. प्रांताधिकार्‍यांनी याबाबत निर्देश जारी केले आहेत.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.