Home आरोग्य देशात कोरोनाचा संसर्ग झाला कमी

देशात कोरोनाचा संसर्ग झाला कमी

0
27

नवी दिल्ली वृत्तसंस्था । देशात कोरोनाच्या रूग्णांची संख्या कमी झाली असून मृत्यूंचे प्रमाण देखील कमी झाल्याचे गत चोवीस तासांमधील आकडेवारीतून अधोरेखीत झाले आहे.

देशातील कोरोनाची दुसरी लाट आता परतीच्या मार्गावर असल्याचे दिसून आले आहे. मागील २४ तासांत १ लाख ६३६ नवे रुग्‍ण आढळले. तर २ हजार ४२७ रुग्‍णांचा मृत्‍यू झाला. १ लाख ७४ हजार ३९९ रुग्‍ण कोरोनामुक्‍त झाले आहेत.नव्‍या रग्‍णसंख्‍येचेही ही आकडेवारी मागील दोन महिन्‍यातील सर्वात कमी आहे.

देशभरात आतापर्यंत २ कोटी ८९ लाख ०९ हजार ९७५ जण कोरोनाबाधित झाले तर २ कोटी ७१ लाख ५९ हजार १८० जणांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत ३ लाख ४९ हजार १८६ रुग्‍णांचा बळी गेला आहे. सध्‍या १४ लाख १ हजार ६०९ रुग्‍णांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती आरोग्‍य विभागाने आज दिली.


Protected Content

Play sound