एरंडोल प्रतिनिधी । एरंडोल तालुक्यात आज तब्बल १०१ कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले असून यामुळे आरोग्य यंत्रणांची चिंता वाढीस लागली आहे.
एरंडोल तालुक्यात तुलनेत उशीरा कोरोनाचा संसर्ग आढळून आला. यानंतर रूग्ण संख्या वेगाने वाढली असली तरी रूग्ण बरे देखील झाले होते. यामुळे मध्यंतरी तालुका कोरोनामुक्त झाला होता. यानंतर पुन्हा एकदा वेगाने कोरोना बाधीतांची संख्या वाढीस लागल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, आज तर दिवसभरात तालुक्यात तब्बल १०१ रूग्ण आढळून आले आहेत. यात शहरासह ग्रामीण भागातील रूग्णांचा समावेश आहे. यामुळे तालुक्यातील आजवरच्या बाधितांचा आकडा १३२६ इतकी झाली आहे. यातील ८८४ रूग्ण बरे झाले आहेत. सध्या ४१७ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तर आजवर कोरोनामुळे तालुक्यात २५ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तालुक्यातील रूणांची वाढती संख्या ही आरोग्य यंत्रणांवर ताण बनल्याचे दिसून आले आहे.