जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्हा प्रशासनाकडून आलेल्या कोरोना अहवालात आज दिवसभरात जिल्ह्यातून १ बाधित रूग्ण आढळून आला आहे. तर दोन रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली.
जळगाव जिल्हा कोरोना अहवालात आज दिवसभरात इतर जिल्ह्यातील एक बाधित रूग्ण आढळून आला आहे. तर जळगाव शहरातून दोन रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. जिल्ह्यात १ लाख ४२ हजार ७८४ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४० हजार २०० रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर आता सध्या ७ बाधित रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. अशी महिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे.