कोरोना : जिल्ह्यात आज आढळला एक रूग्ण

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा कोवीड रुग्णालयाने आज पाठवलेल्या कोरोना अहवालात जिल्ह्यात दिवसभरात एक बाधित रुग्ण आढळलेला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्‍हाण यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

जिल्ह्यात आजपर्यंत १ लाख ४२ हजार ७३८ बाधित रुग्ण आढळून आले आहे. यापैकी १ लाख ४० हजार १५८ रुग्ण बरे होऊन घरी परतला आहे. त्याचप्रमाणे २ हजार ५७५ रुग्ण उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सध्या ९ रुग्ण ॲक्टिव्ह असून आज एकही रुग्ण बरा झालेला नाही आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी आज सायंकाळी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

 

Protected Content