कोरोना : जिल्ह्यात आज दिवसभरात ८७७ बाधित आढळले; ७२० रूग्ण कोरोनामुक्त

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा प्रशासनाच्या कोवीड विभागाने पाठविलेल्या दिवसभराच्या अहवालात आज जिल्ह्यात ८७७  कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहे. तर ७२० रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. जळगाव शहरासह भुसावळ आणि जामनेर तालुक्यातील कोरोना संसर्ग वाढलेलाच आहे. 

आजची आकडेवारी

जळगाव शहर- १३३, जळगाव ग्रामीण- ६२, भुसावळ-१०१, अमळनेर-२२, चोपडा-४०, पाचोरा-४३, भडगाव-१८, धरणगाव-३३, यावल-३१, एरंडोल-२३, जामनेर-१०१, रावेर-४८, पारोळा-२४, चाळीसगाव-९१, मुक्ताईनगर-४०, बोदवड-५५  आणि इतर जिल्ह्यातील १२ असे एकुण ८७७  बाधित रूग्ण आढळून आले आहे.

 

जिल्हा कोवीड रूग्णालयात आजपर्यंत जिल्ह्यात १ लाख २९  हजार ४९  रूग्ण बाधित आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख १७ हजार ९ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर ९ हजार ७२० रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. आज दिवसभरात १६ कोराना रूग्णांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.

 

Protected Content