जळगाव प्रतिनिधी । जिल्हा कोवीड रूग्णालयाने पाठविलेल्या कोरोना अहवालात आज दिवसभरातून ७ बाधित रूग्ण आढळले आहे. तर ६ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी कळविले आहे.
कोरोना अहवालानुसार जळगाव शहर-२, जळगाव ग्रामीण -१, भुसावळ-१, अमळनेर-१ आणि चाळीसगाव-२ असे एकुण ७ बाधित रूग्ण आढळले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ४२ हजार ५७९ रूग्ण बाधित आढळून आले आहेत. त्यापैकी १ लाख ३९ हजार ९१९ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर ८५ बाधित रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. जिल्ह्यात आजवर २ हजार ५७५ रूग्णांची उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी कळविले आहे.