जळगाव प्रतिनिधी । जिल्हा कोवीड रूग्णालयाने पाठविलेल्या कोरोना अहवालात आज देखील बाधित रूग्ण संख्या कमी असल्याचे दिसून आले. दिवसभरात आज ६४ बाधित रूग्ण आढळून आले असून १५९ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर एका बाधित रूग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
जिल्हाभरातील आकडेवारी
जळगाव शहर-२, जळगाव ग्रामीण-५, भुसावळ-५, अमळनेर-५, चोपडा-५, पाचोरा-४, भडगाव-१, धरणगाव-३, यावल-३, एरंडोल-२, जामनेर-४, रावेर-६, पारोळा-५, चाळीसगाव-८, मुक्ताईनगर-१, बोदवड-३ आणि इतर जिल्ह्यातील २ असे एकुण ६४ बाधित रूग्ण आढळून आले आहे.
जिल्ह्यात आजच्या अहवालानुसार आजपर्यंत एकुण १ लाख ४१ हजार ६५८ बाधित रूग्ण आढळून आले आहे. तर १ लाख ३७ हजार ३६१ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर १ हजार ७३३ रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. आज दिवसभरात जळगाव ग्रामीण मधून एका बाधित रूग्णाचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्स डॉ. एन.एस.चव्हाण यांनी कळविले आहे.