जळगाव प्रतिनिधी । जिल्हा प्रशासनाने पाठविलेल्या कोरोना अहवालात आज दिवसभरात ५ बाधित रूग्ण आढळून आले आहे. तर १० बाधित रूग्ण कोरोनामुक्त झाली आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी कळविले आहे.
कोरोना अहवालानुसार जळगाव शहरात दोन आणि भुसावळ तालुक्यात तीन असे एकुण ५ बाधित रूग्ण आढळून आले आहे. उर्वरित १४ तालुका निरंक असल्याचे दिसून येत आहे. अहवालानुसार जिल्ह्यात आजपर्यंत एकुण १ लाख ४२ हजार ६१८ बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ३९ हजार ९९२ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर ५१ रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. जिल्ह्यात आजपर्यंत २ हजार ५७५ रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हाशल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी कळविले आहे.