जळगाव प्रतिनिधी । जिल्हा रूग्णालयाने पाठविलेल्या कोरोना अहवालात आज संक्रमित रूग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रूग्णांची संख्या अधिक असल्याचे दिसून आले आहे. दिवसभरात १५८ बाधित रूग्ण आढळले तर ४९० रूग्ण बरे होवून घरी परतले आहे.
जिल्ह्यातील आजची आकडेवारी
जळगाव शहर-७, जळगाव ग्रामीण-५, भुसावळ-१४, अमळनेर-६, चोपडा-२, पाचोरा-१६, भडगाव-२, धरणगाव-१, यावल-८, एरंडोल-१९, जामनेर-७, रावेर-४, पारोळा-२, चाळीसगाव-४७, मुक्ताईनगर-२, बोदवड-१२ आणि इतर जिल्ह्यातील ४ असे एकुण १५८ बाधित रूग्ण आढळले आहे.
आजच्या अहवालानुसार आजपर्यंत जिल्ह्यात एकुण १ लाख ३९ हजार ९८५ बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ३१ हजार ८७४ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर ५ हजार ५७९ रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. आज ४ कोरोना संक्रमित आढळून आले आहे अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे.