कोरोना : जिल्ह्यात आज दिवसभरात १५ बाधित रूग्ण आढळले; ९ तालुके निरंक

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा कोवीड रूग्णालयाने आज पाठविलेल्या कोरोना अहवालात दिवसभरात १५ बाधित रूग्ण आढळून आले आहे तर ६८ रूग्ण कोरोनामुक्त झाली आहे. त्यात नऊ तालुके निरंक असल्याचे दिसून आले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी कळविले आहे. 

तालुकानिहाय आजची आकडेवारी

जळगाव शहर-०, जळगाव ग्रामीण-०, भुसावळ-१, अमळनेर-१, चोपडा-०, पाचोरा-०, भडगाव-०, धरणगाव-१, यावल-०, एरंडोल-१, जामनेर-०, रावेर-०, पारोळा-१, चाळीसगाव-९, बोदवड-० आणि इतर जिल्ह्यातील १ असे एकुण १५ बाधित रूग्ण आढळून आले आहे.

जिल्हा रूग्णालयाने आज पाठविलेल्या कोरोना अहवालात आजपर्यंत १ लाख ४२ हजार ३७६ रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ३९ हजार ४०३ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे तर ४०० रूग्ण विविध रूग्णालयात उपचार घेत आहे. आजच्या अहवालानुसार जिल्ह्यातील ९ तालुके निरंक असल्याचे दिसून येत आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्स डॉ. एन.एस.चव्हाण यांनी कळविले आहे. 

 

Protected Content