जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात आज नव्याने १२ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहे. सध्या जिल्ह्यात ३६ कोरोना बाधित रूग्ण विविध रूग्णालयात उपचार घेत आहे. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किरण पाटील यांनी कळविले आहे.
जळगाव जिल्ह्यात जून महिन्याच्या सुरूवातीपासून कोरोना रूग्ण संख्येत वाढ होत आहे. गेल्या चोवीस तासात जळगाव जिल्ह्यात नव्याने १२ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहे. यात जळगाव शहर ५, भुसावळ तालुका ६ आणि चोपडा तालुक्यातून १ असे एकुण १२ रूग्ण आढळून आले आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ५१ हजार ६१३ कोरोना रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४८ हजार ९८५ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. सध्या जिल्ह्यात ३६ रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील यांनी प्रसिध्दपत्रकान्वये कळविले आहे.