Home Uncategorized सहकार व शिक्षण महर्षी जे.टी. महाजन यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली!

सहकार व शिक्षण महर्षी जे.टी. महाजन यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली!


फैजपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सहकार महर्षी आणि शिक्षण महर्षी स्वर्गीय दादासाहेब जे.टी. महाजन यांच्या १०१ व्या जयंतीनिमित्त यावल तालुक्यातील न्हावी आणि परिसरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. परिसरातील मान्यवर, संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ आणि त्यांच्या कुटुंबीयांनी दादासाहेबांच्या कार्याचे स्मरण करत त्यांना विनम्र अभिवादन केले.

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी त्यांच्या न्हावी येथील राहत्या घरी झाली. येथे विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी दादासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. त्यानंतर न्हावी ग्रामपंचायतच्या सभागृहात सरपंच देवेंद्र चोपडे आणि सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी दादासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहिली.

त्यानंतर जे.टी. महाजन फ्रूट सेल सोसायटीच्या आवारात दादासाहेबांच्या अर्धपुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. यानंतर मुख्य कार्यक्रम जे.टी. महाजन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या आवारात आयोजित करण्यात आला होता. येथे त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास आणि समाधी स्थळावर पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष शरद महाजन, उपाध्यक्ष उल्हास चौधरी व मार्तंड भिरुड, सचिव विजय झोपे, सहसचिव शशिकांत चौधरी, आमदार अमोल जावळे, माजी आमदार अरुण पाटील, डिगंबर महाराज मठ संस्थान पंढरपूरचे अध्यक्ष नरेंद्र नारखेडे, भागवत भाऊ पाटील (माजी व्हा चेअरमन), आरती महाजन (माजी जि. प. सदस्या), जयश्री चौधरी, जिल्हा दूध संघ संचालक नितीन चौधरी, यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती नितीन चौधरी, सुभाष भंगाळे, प्रभाकर सरोदे, विजय परदेशी, नारायण बापू चौधरी, राकेश फेगडे, नितीन राणे, हर्षल पाटील, हिराभाऊ चौधरी, विलास चौधरी, योगीराज बऱ्हाटे, उमेश पाटील, राजू महाजन, पांडुरंग सराफ, लिलाधर चौधरी, प्रविण वारके, यशवंत तळेले, राकेश जैन, डॉ. नरेंद्र कोल्हे, निळू शेठ भंगाळे, मुन्ना भाऊ पाटील, भूषण पाटील, निलेश पाटील, रामा होले, किशोर वाघुळदे, पराग वाघुळदे, धीरज चौधरी, भारती पाटील, लताताई मेढे, आलिशान ताई तडवी, अनिल चव्हाण, रवींद्र तायडे, किशोर वाणी, अमोल वारके, शरद ठोंबरे, रवींद्र झोपे, पंकज बोरोले, चेतन तळले, सुजय महाजन, हर्षद महाजन, गिरीश महाजन, पिंटू राणे, हेमराज चौधरी, किरण चौधरी, उमेश बेंडाळे, संदेश महाजन, संजय रल, पिंटू तेली यांच्यासह तंत्र व वैद्यक शिक्षण मंडळ संचलित विविध शाखांचे सर्व प्रमुख, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी दादासाहेबांच्या शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रातील योगदानाला उजाळा देत त्यांना आदरांजली वाहिली.


Protected Content

Play sound