शेंदुर्णी, ता. जामनेर प्रतिनिधी | पहुर पोलिस स्टेशनमध्ये नव्याने रुजू झालेले पोलिस निरीक्षक अरुण धनवडे यांनी येथिल नगरपंचतीस सदिच्छा भेट दिली.
यावेळी मुख्याधिकारी साजिद पिंजारी यांनी नगरपंचायततर्फे त्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला. सत्काराला उत्तर देतांना कोरोना नियमांच्या पार्श्वभूमीवर येथिल सार्वजनिक गणेशोत्सव विसर्जन व गावातील कायदा सुव्यवस्था याविषयी पो.नि.अरुण धनवडे यांनी आढावा घेतला. व नगरपंचायत कर्मचार्यांना कर्तव्य निभावतांना कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास पोलिस मदत उपलब्ध करून देण्यात येईल असे आश्वासन उपस्थित कर्मचार्यांना दिले.
यावेळी मुख्याधिकारी साजिद पिंजारी यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना कोरोना काळात नगरपंचायत कर्मचार्यांना पोलिस खात्याने पुरविलेल्या सरंक्षण व मदतीचा आवर्जून उल्लेख केला तसेच पोलिस प्रशासन व नगरपंचायत प्रशासनाने एकदिलाने काम केल्यानेच शेंदूर्णी नगरपंचतीस कोरोना महामारीचा प्रसार रोखण्यात मदत झाली असे सांगितले कोविड अलगीकरण केंद्र सुरू करतांना पोलिसांनी दिलेल्या सहकार्या बद्दल पोलिस प्रशासनाचे आभार मानले.
कार्यक्रमात प्रस्तावित करतांना अमृत खलसे यांनी नवनियुक्त पोलिस निरीक्षक अरुण धनवडे यांनी शेंदूर्णी नगरीमध्ये १५ दिवसातच आपल्या कर्तव्य कठोरते मुळे कायदा व सुव्यवस्थेवर नियंत्रण मिळवून गावात शिस्तीचे वातावरण निर्माण केले त्याबद्दल प्रशंसा केली तसेच गावातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी नगरपंचायत प्रशासन व नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन केले.यावेळी नगर अभियंता भय्यासाहेब पाटील पाणीपुरवठा अभियंता शोहेब काझी,माझी वसुंधरा अभियान प्रमुख लोकेश साळी, अभियंता विठ्ठल पाटील,नगरसेवक निलेश थोरात,गणेश पाटील,शाम गुजर,गावातील नागरिक व नगरपंचायत कर्मचारी उपस्थित होते.