जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | कवयित्री बहिणाबार्स चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा दीक्षांत सोहळा उद्या होत असून यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. तर यंदा देखील सुवर्णपदकांमध्ये मुलींनीच बाजी मारल्याचे दिसून आले आहे.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे उद्या दिनांक २४ मे रोजी तिसावा दीक्षांत सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे ऑनलाईन पध्दतीत सहभागी होणार आहेत. या सोहळ्याआधी विद्यापीठातर्फे शैक्षणिक वर्ष २०२०-२१ची सुवर्णपदक प्राप्त विद्यार्थ्यांची यादी जाहीर झाली असून, दीक्षान्त समारंभात विद्यार्थ्यांना सुवर्णपदक प्रदान करण्यात येणार आहे. यंदा ९८ सुवर्णपदक देण्यात येणार आहेत. यात ६५ विद्यार्थिनी व ३३ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या वर्षी देखील मुलींनीच गुणवत्ता यादीत बाजी मारल्यामुळे जास्त सुवर्णपदके ही मुलींनाच मिळणार असल्याचे या यादीतून अधोरेखीत झाले आहे.
विविध शाखांमधील सुवर्णपदक प्राप्त विद्यार्थी-विद्यार्थीनी खालीलप्रमाणे आहेत.
विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा : करिश्मा दिलीप सर्जे (एमसीए), कोयल अनिल भंगाळे (एम.एस्सी कॉम्प्युटर), कोमल मुकुंद कोठावदे (एम.एस्सी आयटी), प्रियंका भिकाजी सोनवणे (एम.एस्सी फिजिक्स), सुशील रमेश पाटील (एम.एस्सी फिजिक्स मटेरियल सायन्स), कविता अनिल मालविया (एम.एस्सी फिजिक्स एनर्जी स्टडी), सुनयना सुनील बारी (एम.एस्सी इलेक्ट्रॉनिक्स), गीता मधुसूदन पाटील (एम.एस्सी पर्यावरणशास्त्र), भावना चंद्रकांत पवार (एम.एस्सी गणित), दीपाली सुनील बोरसे (एम.एस्सी मॅथेमॅटिक्स स्पेशलायझेशन इन कॉम्प्युटेशन मॅथ), भावना प्रवीण खैरनार (एम.एस्सी स्टॅटिस्टिक), भूषण सुभाष पाटील, शीतल धनलाल तेली (एम.एस्सी पॉलिमर केमिस्ट्री), देवयानी सुनील भामरे (एम.एस्सी केमिस्ट्री), शीतल नरेंद्र पाटील (एम.एस्सी ऍनालिटिकल केमिस्ट्री), सतीश बारकू पाटील (एम.एस्सी पेस्टिसाइड व ऍग्रोकेमिकल्स), राहुल अशोक पाटील (एम.एस्सी इंडस्ट्रीयल केमिस्ट्री), अंजली कैलाशचंद्र जांगीड (ऑरगॅनिक केमिस्ट्री), प्रतीक्षा विजय पाटील (एम.एस्सी इन ऑरगॅनिक केमिस्ट्री), प्रज्ञा प्रबुद्ध शिरसाठ (एम.एस्सी केमिस्ट्री), प्राची दिनेश खैरनार (एम.एस्सी बायोकेमिस्ट्री), आसिफ युसूफ पटेल (एम.एस्सी बायोटेक्नॉलॉजी), जागृती निंबा पाटील (एम.एस्सी मायक्रोबायोलॉजी), जयश्री अरुण पंडित (एम.एस्सी बॉटनी), सलोनी कमलेश राठोड (एम.एस्सी/एम.ए भूगोल), पुष्कर दिलीप पाटील (बी.एस्सी पदार्थ विज्ञान), धर्मेश कन्हय्या मराठे, पूनम देवमन बागूल, विशाखा अशोक जैन (बी.एस्सी रसायनशास्त्र), वैष्णवी राजेंद्र बाविस्कर (बी.एस्सी प्राणिशास्त्र), खान हुमाईरा परवीन अयुब खान (बी.एस्सी वनस्पतिशास्त्र), जान्हवी जगदीश पाटील (बी.एस्सी मायक्रोबायोलॉजी), शिवानी राजेश सिंह (बी.एस्सी बायोटेक्नॉलॉजी), राहुल जितेंद्र सांडेचा (बी.एस्सी बायोकेमिस्ट्री), काजल नागेश्वर सुलताने (बी.एस्सी कॉम्प्युटर सायन्स), प्रेरणा धनंजय ठाकरे (बी.एस्सी गणित), निखिल अनिल सोनार (बी.एस्सी संख्याशास्त्र), प्रीतम पीरन शिरसाठ (बी.एस्सी भूगोल), अमोल राजेंद्र गवारे (एम. फार्मसी केमिस्ट्री), कोमल अनराज धोका (एम फार्मसी फार्माकॉग्नॉसी), शीतल भागवत शिंदे (एम फार्मसी क्वालिटी ऍश्युरन्स), नरेंद्र राजू नागपुरे, मानसी युवराज पवार (बी.फार्मसी), मोहित सचिनकुमार शहा (बी.टेक केमिकल इंजिनिअरिंग), भरत पंडित चौधरी (बी.टेक ऑइल, फॅट्स वॅक्सेस), रोहन जितेंद्र पाटील (बी.टेक फूड्स), स्वप्निल दशरथ महाजन (बी.टेक प्लास्टिक), जान्हवी मनोज खंडेलवाल (बी.टेक पेंट्स), गौरी अरविंद काळे (बी.ई सिव्हिल), मेघना गजानन सुपे (बीई इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन), तृषाली भरत राठोड (बीई इलेक्ट्रिकल), मनुप्रतापसिंह हिरेंद्रसिंह परमार (बीई मॅकेनिकल), मृणाल अनिल पाटील (बीई कॉम्प्युटर), सृष्टी सतीश पाटील (बीई इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी), शीतल श्रीकिसन अग्रवाल (बीई बायोटेक्नॉलॉजी), हर्षल सुनील पाटील (बीई केमिकल), डी.क्लिटंन क्रिस्टोफर (बीई ऍटोमोबाइल)
आंतर विद्याशाखीय अभ्यास विद्याशाखा : वैशाली नाना पाटील (एम.ए. मास कम्युनिकेशन), स्नेहा ओंकार जाधव (एम.ए. डॉ. आंबेडकर विचारधारा), गोविंद गनाजी नांदेडे (एम.ए स्त्री अभ्यास), महिमा भरत गंग (एम.ए. संगीत), विजय काळू देवरे (बीएड), रेशमा पूनमचंद वारके (एम.एड).
वाणिज्य व्यवस्थापन विद्याशाखा : विवेक मोहन पाटील, तेजल रवींद्र बोरसे (एमबीए), वर्षा रामचंद्र पंजाबी (एमबीए फायनान्स), नील मनीष अग्रवाल (एम.कॉम), निकिता मिलिंद सोनजे (एम.कॉम ऍडव्हान्स अकाउंटन्सी), सेजल धर्मेंद्र पांडे (बी.कॉम)
मानव विज्ञान विद्याशाखा : स्नेहा महेंद्र वाघ, नीरज देविदास शिरनामे (एम.ए इंग्रजी), आनंदराव नानाभाऊ पदमार, वर्षा सुनील सैंदाणे (एम.ए मराठी), सरिता संतोष माळी (एम.ए हिंदी), कल्पेश अशोक खरे (एम.ए. इतिहास), निकिता लक्ष्मण वळवी (एम.ए. समाजशास्त्र), वेदिनी मिलिंद पाटील (एम.ए अर्थशास्त्र), मगन रामदेव गावित (एम.ए मानसशास्त्र), युगंधरा राजेंद्रसिंग पाटील (बीए इंग्रजी), काजल तानाजी दळवी (बीए मराठी), पूजा गजानन नवलकर (बीए हिंदी), कौसरबी शेख नियाजोद्दीन (बीए उर्दू), आराध्या गौरव संतराज (बीए संस्कृत), मृणाल अविनाश सैंदाणे (बीए इतिहास), अजय वसंत राठोड (बीए अर्थशास्त्र), स्वरांगी वसंत अहिरे (बीए भूगोल), संगीता अभिमन्यू अडकमोल (एल.एल.एम), गायत्री अभिमान महाजन (बीए एलएलबी), राहुल चंद्रकांत देशमुख (३ वर्षीय विधी अभ्यासक्रम), जैकी प्रकाशलाल वाधवानी (एल.एल.बी.)
दरम्यान, यंदा देवयानी भामरे, अंजली जांगीड, जयश्री पंडित, प्रेरणा ठाकरे, गौरी काळे, सेजल पांडे, मगन गावित आणि स्वरांगी अहिरे या विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन सुवर्णपदके प्राप्त झाली आहे.