दोन वर्षासाठी हद्दपार असलेल्या गुन्हेगाराला शस्त्रासह अटक

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  गुन्हेगारी प्रकरणात दोन वर्षांसाठी जिल्हा हद्दपार करण्यात आलेल्या संशयित आरोपी विशाल मुरलीधर दाभाडे (वय-२२) रा. रामेश्वर कॉलनी याला कोंबींग ऑपरेशन राबवित असतांना घरी आढळून आला. त्याच्याकडून लोखंडी सुरा हस्तगत केला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

जिल्हाधिकारी यांनी फेब्रुवारी २०२३ मध्ये गुन्हेगार विशाल मुरलीधर दाभाडे (वय-२२) रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव याला दोन वर्षांसाठी हद्दपारीचे आदेश काढले होते. तरी देखील विशाल दाभाडे हा हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन करून रामेश्वर कॉलनीत आलेला असल्याचे पोलीसांना समजले. दरम्यान  १७ जुलै रोजी मध्यरात्री एमआयडीसी पोलीसांनी कोंबिंग ऑपरेशन राबविले. पोलीसांनी केलेल्या कारवाई हद्दपार असलेला आरोपी विशाल दाभाडे याला पोलीसांनी अटक केली. त्यांच्याकडून लोखंडी सुरा हस्तगत केला आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सतिष गर्जे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक सुनिल सोनार करीत आहे.

Protected Content