जिल्ह्यात अटल भूजल योजना अंतर्गत होणार अभिसरण सप्ताह

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा जळगाव अंतर्गत अटल भूजल योजनेमध्ये डी एल आय #3 अभिसरणांतर्गत सन २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी माहे-एप्रिल २०२४ ते ऑगस्ट २०२४ या कालावधीत अभिसरणांतर्गत झालेल्या मागणी व पुरवठा आधारित उपाययोजनांचे विविध संलग्न विभागांकडुन माहिती गोळा करण्याकामी २० ते २७ सप्टेंबर, २०२४ या कालावधीत डीएल आय -३ अभिसरण सप्ताह साजरा करण्यात येत आहे.

सदर सप्ताहबाबत जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, अटल भूजल योजना जिल्हा नियोजन व समन्वय समिती, जळगांव यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय, जळगांव येथे 24 सप्टेंबर, 2024 रोजी 3.00 वा. पुरवठा व मागणी आधारित उपाययोजनांच्या अनुषंगाने जिल्हास्तरावर बैठक घेण्यात आली. त्यानुसार दर दिवशीp राबवायच्या उपक्रमाचे वेळापत्रक खालील प्रमाणे,

पहिला दिवस – सप्ताहाचे उदघाटन व संलग्न विभागांची जिल्हास्तरावर बैठक, दुसरा दिवस – संलग्न विभागांना भेट देणे, तिसरा दिवस संलग्न विभागाना भेट देणे, चौथा दिवस – पुरवठा व मागणी आधारित उपाययोजनांच्या अनुषंगाने जिल्हास्तरावर बैठक घेणे, पाचवा दिवस – पुरवठा व मागणी आधारित कामांचा माहिती तयार करुन सादर करणे, असे वरिष्ठ भूवैज्ञानिक भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

Protected Content