भुसावळ -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील वराडसीम गावातील नियंत्रण प्रयोग शाळेतून ६ हजार ५५० रूपये किंमतीचे ईलेक्ट्रीक वजनकाटा अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना २० मार्च रोजी दुपारी १२ वाजता उघडकीला आले आहे. याप्रकरणी गुरूवार २१ मार्च रोजी रात्री ९ वाजता अज्ञात चोरट्यांविरोधात भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, भुसावळ तालुक्यातील वराडसीम गावात नियंत्रण प्रयोग शाळा आहे. २२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६.३० ते २० मार्च रोजी दुपारी १२ वोच्या दरम्यान शाळेचे खिडक्यांचे गज कापून अज्ञात चोरट्यांनी ६ हजार ५५० रूपये किंमतीचे ईलेक्ट्रीक काटा चोरून नेल्याचे उघडकीला आले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर उपविभागात गुण नियंत्रणचे कनिष्ठ अभियंता प्रविण भिरूड यांनी भुसावळ तालुका पोलीसात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुरूवार २१ मार्च रोजी रात्री ९ वाजता भुसावळ तालुका पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ युनूस मुसा शेख हे करीत आहे.