फैजपुर, प्रतिनिधी | मुलांना उच्च शिक्षण घेता यावे यासाठी लोकसहभागातून धनाजी नाना महाविद्यालायची निर्मिती झाली आहे. या महाविद्यालयाचे असंख्य माजी विद्यार्थांनी शिक्षण,समाज, अर्थ, विज्ञान, राजकारण कृषी क्षेत्रात आपलं नाव मोठं केलं असल्याचे प्रतिपादन तापी परिसर विद्या मंडळाचे अध्यक्ष शिरीष चौधरी यांनी केले.
महाविद्यालयात शेतकरी ,शेतमजूर, ग्रामीण दलित, आदिवासी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत याचा मनस्वी आनंद होत आहे. बदलत्या काळानुसार नवीन अभ्यासक्रम सुरू केले जात आहेत. पुढील काळात प्लेसमेंट सेल निर्माण करून विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातील असेही चौधरी यांनी केले. ते तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयात माजी विद्यार्थी स्नेह मेळाव्यात बोलत होते.याप्रसंगी व्यासपीठावर प्राचार्य डॉ. पी.आर.चौधरी, तापी परिसर विद्या मंडळ व्यवस्थापन परिषद सदस्य मिलिंद वाघुळदे , प्राचार्य तुकाराम बोरोले -अध्यक्ष माजी विद्यार्थी संघटना, गणेश गुरव मुख्याध्यापक, प्रा. डॉ. जतीन मेढे, प्राचार्य नि. रा. फेगडे, चंद्रशेखर चौधरी, चंद्रकांत, भाऊराव , माजी विद्यार्थी मंडळाचे समन्वयक उपप्राचार्य प्रा. डी. बी. तायडे, उपप्राचार्य डॉ.उदय जगताप उपस्थित होते.प्रास्ताविक प्रा.डी बी तायडे यांनी केले प्राचार्य तुकाराम बोरोले यांनी यासंस्थेने अनेक पिढ्या घडविल्या आहेत म्हणून या संस्थेचा इतिहास जपून ठेवण्याची गरज आहे असे प्रतिपादन केले. उपप्राचार्य डॉ. उदय जगताप यांनी NAAC संदर्भातील आवश्यक माहिती दिली. गणेश गुरव, डॉ कल्पना पाटील व मोजेस जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. प्राचार्य डॉ. पी. आर. चौधरी यांनी यावल व रावेर तालुक्यातील आर्थिक, शैक्षणिक विकास या महाविद्यालयाचे योगदान स्पष्ट केले. सूत्रसंचालन प्रा.कुमुदिनी धांडे, प्रा. राजेंद्र राजपुत यांनी केले तर आभार प्रा.डॉ कल्पना पाटील यांनी मानले.