कासोदा येथे अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ (व्हिडिओ)

WhatsApp Image 2019 09 08 at 7.15.07 AM

कासोदा ता.एरंडोल, प्रतिनिधी | येथील महादेव मंदिर येथे कासोदा गावाचे आराध्यदैवत प.पु.गोविंद महाराज यांचा ६६ वा सप्ताह दि.६ सप्टेंबर रोजी प्रारंभ झाला. महाराज गणेश पाठक , व प्रमोद महाराज यांनी सकाळी ३ वाजेपासून पूजाविधी गोविंद महाराज यांच्या मूर्तीचा व मंदिरातील श्री महादेवाच्या पिंडेचा पंच अमृताने अभिषेक करून गांवातील श्रीभक्त डॉ.  पांडुरंग पिंगळे, मनोहर विश्राम मराठे, शशिकांत साळुंखे, विजय आनंदा चौधरी, ईश्वर साहेबराव गढरी, यांच्या हस्ते सपत्निक पूजा ,अभिषेक, महाआरती करून श्री गोविंद महाराज  अखंड हरिनाम सप्तहास शुक्रवार रोजी प्रारंभ करून श्रीफळ कळस भरून ठेवण्यात आले.

 

विशेष म्हणजे हे श्रीफळ हे स्वतः गोविंद महाराज यांच्या हाताचे आहे असे मानले जाते . तर आज त्या श्रीफळास व सप्ताहास ६५ वर्ष पूर्ण होऊन ६६व्या वर्षी प्रदार्पण केले आहे. याप्रसंगी सप्ताह पंच कमिटीचे नवनिर्वाचित अध्यक्ष पत्रकार गोकुल शिंपी, उपाध्यक्ष सुरेश क्षीरसागर, उपाध्यक्ष दामू भोई ,सचिव पांडुरंग आप्पा वाणी, पंडित आप्पा पाटील, मंदिराचे  सेवेकरी पुजारी शंकरदास बैरागी , भिकनदास बैरागी, चरणदास बैरागीयांच्यासह वसंत धोबी व सदस्य, गावातील ग्रामस्थ पत्रकार बांधव महिला, तरुण, तरुणी यावेळी उपस्थित होते. सप्ताह प्रारंभ दिवसापासुन तर समाप्तीपर्यंत दरदिवशी सकाळी काकड आरती संध्याकाळी ६ ते ७ हरिपाठ, ७ ते ८ हनुमान चालीसा, रात्री ९ते११ कीर्तन अशा कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. रात्रभर टाळ वाजवून भजन म्हणण्यासाठी शैलेश पांडे, सचिन चौधरी, लखन बैरागी आदी उपस्थित असतात. दि.६ सप्टेंबरपासुन रोज रात्री ९ वाजेला मठाधिपती ह.भ.प.विठ्ठल महाराज (आडगावकर) , विनोदाचार्य ह.भ.प.राजेंद्र महाराज(कंदानेकर), उल्केश महाराज (पातोंडेकर), हेमंत महाराज(आडावदकर ), पुरुषोत्तम महाराज (बुलढाणेकर), सूर्यभान महाराज (शेळगावकर) यांचे कीर्तन होणार आहे. सप्ताह समारोपाच्या दिवशी समाज प्रबोधनकार ह.भ.प. विश्वनाथ महाराज (वाडेकर) यांचे काल्याचे किर्तन दि.१४ रोजी सकाळी ८,३० ते १० वाजेपर्यंत होईल. यानंतर ११ वाजेपासून महाप्रसाद वाटप कार्यक्रम सुरू होणार आहे. या सप्ताहाचे विशिष्ट म्हणजे पंधरा लाखाच्यावर खर्च होणारा महाराष्ट्रातील दोन नंबरचा सप्ताह आहे. यासाठी ग्रामपंचायत कासोदा, बालाजी ऑईल मिल एरंडोल, महालक्ष्मी सॉ मिल कासोदा यांच्या विशेष सहकार्याने व पंचक्रोशीतील समस्त ग्रामस्थ पदाधिकारी ह.भ.प. महाराज यांचे , सर्व सांप्रदायिक भजनी मंडळ यांचे तर सर्वात मोलाचे असे सहकार्य म्हणजे जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस निरीक्षक जळगाव, अप्पर पोलीस निरीक्षक चाळीसगाव , यांच्या अंतर्गत स्थानिक पोलीस स्टेशनचे अनमोल सहकार्य या कासोदा येथील हरिनाम सप्तहास लाभते. तर शेवटच्या दिवशी सकाळी कासोद्यातील रणरागिनी तरुणी महाराष्ट्रीयन नृत्य लेझीम खेळ खेळून मंदिराजवळ पालखीला भेट देतात. तर संध्याकाळी ५ वाजेपासून गावात पालखी मिरवणूक सुरू होते. गांवातील सर्व सांस्कृतिक मित्र मंडळ हे पालखीच्या पुढे ढोल ताशे लावून वाजत गाजत नाचत संपूर्ण गावात रात्रभर पालखी मिरवणूक काढत असतात.

Protected Content