Home Cities अमळनेर अमळनेर तालुका भडगांव आर.टी.ओ कार्यालयाला न जोडता जळगावाला सुरू ठेवा

अमळनेर तालुका भडगांव आर.टी.ओ कार्यालयाला न जोडता जळगावाला सुरू ठेवा


अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | २० मार्च बुधवार रोजी अमळनेर तालूक्यातील आर.टी.ओ हे शासनाने भडगाव येथे नवीन विभागीय आर.टी.ओ कार्यालय सुरू केल्याने अमळनेर हे भडगाव तालुक्यातील आर.टी.ओ कार्यालयाला जोडण्यात आले आहे.

पण यामुळे अमळनेर तालुक्यातील नागरिकांची गैरसोय होणार आहे, कारण भडगाव येथे येण्याजाण्यासाठी सुविधा उपलब्ध नसल्यामुळे जळगाव हे जिल्हयाचे ठिकाण असून सर्वसामान्य लोकांसाठी जिल्हाधिकारी कार्यालय, पोलिस अधीक्षक कार्यालय व इतर महत्वाचे कार्यालय असल्यामूळे एकाच ठिकाणी असल्यामुळे तिथेच आर.टी.ओचे कार्यालय पूर्ववत सुरू ठेवण्यात यावे अशी मागणी अमळनेर तालुक्यातील नागरिकांनी अमळनेर उपविभागीय अधिकारी यांना निवेदन केली आहे. जळगावात येण्यासाठी मुबलक सुविधाही उपलब्ध असल्यामुळे नागरिक ही मागणी करत आहे.


Previous articleरावेर लोकसभा मतदार संघात १८ लाख ११,९५१ मतदार
Next articleInternational Dating Benefits
पत्रकारितेत १५ वर्षांचा अनुभव. मुद्रीत, इलेक्ट्रॉनिक आणि डिजीटल या तिन्ही माध्यमांमध्ये पारंगत. क्राईम आणि राजकीय स्टोरीज ही स्पेशालिटी. वृत्तासोबतच प्रतिमा आणि व्हिडीओ एडिटींगमध्येही कौशल्य ही अजून एक खासियत. लाईव्ह ट्रेंडस न्यूजमध्ये पहिल्या दिवसापासून कार्यरत असणारे जितेंद्र कोतवाल हे आता वृत्तसंपादक पदाचा कार्यभार सांभाळत आहेत. बातम्यांसाठी संपर्क : ९३७०४०३२००

Protected Content

Play sound