अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी शनिवार, रविवारी शाळा सुरू ठेवा – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे शिक्षकांना आवाहन

सोलापूर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे गेल्या दोन वर्षापासून विद्यार्थ्यांचं ऑनलाइन आणि ऑफलाईन अशाप्रकारे शिक्षण सुरू असल्यामुळे अभ्यासक्रम अपूर्ण राहण्याची शक्यता असते. तो अभ्यासक्रम भरून काढण्याचे काढण्यासाठी शिक्षकांनी शनिवार-रविवारी शाळा सुरू ठेवाव्यात असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यभरातील शिक्षकांना केलं आहे.

कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे गेल्या दोन वर्षापासून विद्यार्थ्यांचं ऑनलाइन आणि ऑफलाईन अशाप्रकारे शिक्षण सुरू आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या नियमित शिक्षणावर परिणाम होऊन त्यांचा अभ्यासक्रम अपूर्ण राहण्याची शक्यता असते. तो अभ्यासक्रम भरून काढण्याचे एक आव्हान प्रत्येक शिक्षकापुढे आहे. त्यामुळे शिक्षकांनी शनिवार-रविवारी शाळा सुरू होऊन अभ्यासक्रम पूर्ण केला पाहिजे. असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यभरातील शिक्षकांना केलं आहे.

सोलापूर येथे जिल्हा परिषदेच्या ‘स्वच्छ शाळा, सुंदर शाळा’ या उपक्रमाच्या पारितोषिक वितरण कार्यक्रमाला अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी संवाद साधतांना ते बोलत होते. ते म्हणाले, कोरोनामुळे गेली दोन वर्षे मुले शाळेत गेली नाहीत. मात्र ही मुलं चांगल्या, स्वच्छ व सुंदर वातावरणात शाळेला जावीत यासाठी तुम्ही ‘ ‘स्वच्छ शाळा, सुंदर शाळा’ हे अभियान राबविले ते अतिशय कौतुकास्पद आहे. हे अभियान मी पुणे जिल्हा व राज्यात राबविण्यासाठी सूचना करणार आहे.

लोकवर्गणीतून जमा केले पावणे सात कोटी रुपये

या अभियानासाठी सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, त्यांचे सहकारी आणि शाळा शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी पुढाकार घेत पावणे सात कोटी लोकवर्गणीतून जमा केले. याविषयी बोलतांना उपमुख्यमंत्री म्हणाले, “पावणे सात कोटी लोकवर्गणीतून जमा करणे येड्या गबाळ्याचे काम नाही. मात्र मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी तुमच्या टीमने हे काम केले, पावणे तीन हजार शाळा स्वच्छ व सुंदर केल्या. ही जिल्हा आणि राज्यासाठी ही अभिमानाची बाब आहे. मात्र यात सातत्य ठेवा” अशी सक्त सूचना करत त्यांनी शाळेचा अभ्यासक्रम भरून काढण्यासाठी शनिवार-रविवारी शाळा सुरू होऊन अभ्यासक्रम पूर्ण करावा असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोलापूरसह राज्यभरातील शिक्षकांना आवाहन केलं आहे.

 

Protected Content