जळगाव, प्रतिनिधी | सौंदर्य हा स्त्रीयांना निसर्गत: लाभलेला अनमोल असा अलंकार आहे. या सौंदर्याला आत्मविश्वासाची, उत्तम व्यक्तिमत्त्वाची व स्वत: दडलेल्या सुप्त कलागुणांची जोड लाभल्यास स्त्रीयांसाठी अनेकानेक संधीचं आकाश खुले होऊ शकतं. मात्र पात्रता व कौशल्य असूनही स्त्रिया किंवा तरुणी या क्षेत्राकडे सहसा वळत नाहीत. यातील महत्त्वाचे कारण म्हणजे त्यांना स्थानिक पातळीवर संधी व योग्य मार्गदर्शन मिळत नाही. त्यांना ती संधी उपलब्ध करुन द्यावी यासाठी गौरा इव्हेंट अँँण्ड इंटरटेनमेंटतर्फे या खान्देशस्तरीय सौंदर्य स्पर्धेचे दि. १२ ते १६ नोव्हेंबर या कालावधीत आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संचालिका गौरी नाईक यांनी पत्रकार परिषदेत दिली. याप्रसंगी संदीप पाटील, मनीष पत्रिकर, पंकज दारा, जयंत पाटील, यशोदार पेंडलया आदी उपस्थित होते.
पुणे येथील गौरा इव्हेंट अॅण्ड एंटरटेनमेंट तर्फे खान्देशस्तरीय सौंदर्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. महिला व तरुणी अशा दोन गटात स्पर्धा होणार असून ऑडिशनसाठी आधी नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. जळगाव, धुळे, नंदूरबार अशा तिनही ठिकाणी स्पर्धेचे ऑडिशन होणार असून त्यातून ६० महिला तरुणींची जळगाव येथे होणा-या स्पर्धेसाठी निवड करण्यात येणार असल्याचे गौरी नाईक यांनी पुढे सांगितले. ग्रँड फिनालेला मिसेस वर्ल्ड सुप्रसिद्ध मॉडेल व अभिनेत्री आदिती गोतीत्रीकर व सुप्रसिद्ध मॉडेल, अभिनेता व माजी क्रिकेटर सलील अंकोला यांची उपस्थिती राहणार आहे. ऑडिशनमधुन निवड झालेल्या सौंदर्यवतींना मार्गदर्शनही करण्यात येणार आहे. नाव नोंदणी करण्यासाठी दि. ३० ऑगस्टपर्यंत ७३९७९२७४१८, ७७४५०७४८५१ या नंबरवर संपर्क साधावा. सप्टेंबर महिन्यात होणा-या ऑडिशनची तारीख व स्थळ कळविण्यात येईल अशी माहिती नाईक यांनी दिली. ऑडिशनमधुन ६० महिला तरुणीची जळगाव येथे होणा-या स्पर्धेसाठी निवड करण्यात येईल. ऑडिशनमधुन निवड केलेल्या सौंदर्यवतींसाठी दि. १२ ते १५ नोव्हेंबर या कालावधीत वेगवगेळ्या सेशन्स त सेमिनार्सचे आयोजन करण्यात येईल. आदिती गोवीत्रीकर व सलील अकोला यांची प्रमूख परीक्षक ( जुरी ) म्हणून उपस्थिती राहणार आहे. सौंदर्य स्पर्धेचा ग्रँड फिनाले दि. १६ नोव्हेंबर रोजी जळगाव.शहरातील खान्देस मॉल येथे होणार आहे.