रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र सीमेजवळ असलेल्या आणि रावेर खरगोन रस्त्यावरील कुसुंबा गावाजवळून विनापरवाना निर्दयीपणे कोंबुन पारडूची वाहतूक कारणारे कंटेनरवर रावेर पोलीसांनी कारवाई केली आहे. या आठवड्यातील ही दुसरी कारवाई असल्याने रावेर पोलीसांचे कौतूक होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र सीमेजवळ असलेल्या आणि रावेर खरगोन रस्त्यावरील कुसुंबा गावाजवळून एका कंटेनरमधून पारडूंची कोंबून वाहतूक होत असल्याची गोपनिय माहिती रावेर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांना मिळाली. त्यानुसार पथकातील पोउनि घनशाम तांबे, पो. कॉ. प्रमोद पाटील, गफ्फार तडवी, विशाल पाटील आणि सचिन घुगे यांनी कारवाई करत कंटेनर क्रमांक ( KN 01 AN 5028) वर कारवाई केली. यात ५१ पारडूंना निर्दयीपणे बांधून कोंबून वाहतूक केली जात असल्याचे निष्पन्न झाले. या कारवाईत एका संशयितला ताब्यात घेतल्याचे समजते. जप्त करण्यात आलेला कंटेनर राजस्थानहून केरळकडे जात असल्याचे समोर आले आहे. रावेर पोलिसांच्या या कर्तव्यदक्षतेमुळे पशुधन तस्करीला आळा बसणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे. सर्व पारडूंना गौशाळा येथे पाठवण्यात आला आहे.