Home क्राईम कंटेनर आणि कारचा भीषण अपघात; एकाच परिवारातील चार जण ठार

कंटेनर आणि कारचा भीषण अपघात; एकाच परिवारातील चार जण ठार


car accident pune
 

पुणे (वृत्तसंस्था) कंटेनर आणि वॅगनर कारमध्ये झालेल्या भीषण अपघातात एकाच परिवारातील चार जण जागीच ठार झाले आहे. पुणे नगर महामार्गावर शिरूर येथे हा भीषण अपघात झाला असून सर्व मृत नांदेड जिल्ह्यातील रहिवासी आहेत.

 

वॅगनर कार अहमदनगरकडून पुण्याच्या दिशेने जात असताना महामार्गावर बंद पडलेल्या कंटेनरला पाठीमागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात किशोर माधव हाके, शुभम माधव हाके, विमल माधव हाके अशी मृतांची नावे आहेत. या तिघांसह अवघ्या 20 दिवसांचे बाळदेखील या अपघातात मृत्यूमुखी पडले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound