बांधकाम कारागिराला मारहाण करून लुटले; दोघांवर गुन्हा दाखल

जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | बांधकाम कारागिराला मारहाण करून 17 हजार रुपयांची रोकड लांबविली; शहर पोलिसात दोघांना गुन्हा दाखल

जळगाव शहरातील छत्रपती शिवाजी नगर ते सुरत रेल्वे गेट दरम्यानच्या बौद्धविहारजवळ एका बांधकाम कारागिराला दोन जणांनी मारहाण करून त्यांच्या जवळील 17 हजार रुपयांची रोकड बळजबरीने काढून चोरी केल्याची घटना मंगळवारी 8 एप्रिल रोजी सकाळी 10.30 वाजता घडली आहे. या संदर्भात रात्री 8 वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात दोन जणविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रवींद्र बाबूलाल लुले (वय 47 रा. राजमालती नगर जळगाव) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला असून बांधकाम कारागीर म्हणून ते काम करत असतात. मंगळवारी 8 एप्रिल रोजी सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास ते छत्रपती शिवाजीनगर ते सुरत रेल्वे गेटच्या दरम्यान असलेल्या बौद्ध विहार जवळ पायी जात असताना संशयित आरोपी शेख हर्षद शेख हमीद (वय 26) आणि वसीम अली शहाबुद्दीन तेली (वय 35 दोन्ही रा.जळगाव) यांनी शिवीगाळ करत मारहाण करून त्यांच्या खिशातील 17 हजार रुपयांची रोकड बळजबरीने चोरून नेली. दरम्यान या संदर्भात रवींद्र लुले यांनी शहर पोलीस ठाण्यात या संदर्भात फिर्यादी त्यानुसार दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. याबाबत पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक रामचंद्र शिखरे करीत आहेत.

Protected Content