Home क्राईम मल्हार पार्क येथून बांधकामाच्या साहित्यांची चोरी

मल्हार पार्क येथून बांधकामाच्या साहित्यांची चोरी


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील हरीओम नगरातील मल्हार पार्क येथे सुरू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी ठेवलेल्या लोखंडी प्लेटा अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सोमवारी १ सप्टेंबर रोजी सकाळी हा प्रकार समोर आला. या घटनेमुळे बांधकाम व्यावसायिक किशोर ओंकार पाटील (वय ४४, रा. द्वारका नगर) यांचे १८ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. या संदर्भात मंगळवारी २ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

किशोर पाटील यांनी आपल्या बांधकामासाठी लागणाऱ्या १८ लोखंडी प्लेटा मल्हार पार्क येथील बांधकामाच्या ठिकाणी ठेवल्या होत्या. मात्र, चोरट्यांनी रात्रीच्या वेळी संधी साधून या १८ लोखंडी प्लेटा चोरून नेल्या. दुसऱ्या सोमवारी १ सप्टेंबर रोजी सकाळी ८.३० वाजता कामावर आल्यानंतर हा प्रकार त्यांच्या लक्षात आला. त्यांनी तात्काळ या घटनेची माहिती पोलिसांना दिली. चोरीला गेलेल्या या प्लेटाची किंमत १८ हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे. याप्रकरणी किशोर पाटील यांच्या तक्रारीवरून जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोहेकॉ सतीश पाटील हे या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत.


Protected Content

Play sound