Home Cities जळगाव बांभोरी येथील एसएसबीटी अभियांत्रिकी महाविद्यालयात संविधान दिवस साजरा

बांभोरी येथील एसएसबीटी अभियांत्रिकी महाविद्यालयात संविधान दिवस साजरा

0
34


जळगाव प्रतिनिधी । संविधान दिवसानिमित्त महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. एस. वाणी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले. तसेच प्राचार्य व महाविद्यालयातील प्राध्यापकांनी पंतप्रधाननरेंद्र मोदी यांच्या ऑनलाईन संविधानचे वाचन या कार्यक्रमात सहभाग नोंदविला.

या दिवसाचे अवचित्य  साधून महाविद्यालयाने जळगावातील सुप्रसिद्ध वकिल सुरज जहांगीर चौधरी यांचे ऑनलाईन व्याख्यान आयोजित केले यात त्यांनी संविधान दिवस आपण का साजरा करतो, संविधानाचा मुख्य उद्देश, घटनात्मक मूल्ये बद्दल विस्तृत मार्गदर्शन केले. सदर व्याख्यानाला महाविद्यालयातील ७० प्राध्यापकांनी सहभाग नोंदविला. कर्यक्रमाला प्राचार्य डॉ. के. एस. वाणी, उपप्राचार्य प्रा. एस. पि. शेखावत याचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. आभार प्रदर्शन प्रा. एम व्ही रावलानी, सांस्कृतिक विभाग प्रमुख यांनी केले . कार्यक्रम साठी प्रा. एम व्ही. रावलानी, प्रा कृष्णा श्रीवास्तव ,प्रा. व्हि. एस. पवार,  NSS प्रोग्राम ऑफिसर , प्रा. आर. बि. सांगोरे विद्यार्थी विकास अधिकारी, प्रा.एम. बी. पाटील , प्रा. गौरव खोडके, आर.आर. पाटील कार्यालय अधिक्षक यांनी सहकार्य केले.

 


Protected Content

Play sound