धरणगाव प्रतिनिधी । तालुक्यातील अनोरे येथील कै.बी.जे. महाजन विद्यालयात आज संविधान दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी संविधान वाचून घेतले. त्याचबरोबर आर.बी.महाले यांनी संविधान विषयी प्रस्ताविक सांगितले. यानंतर संविधान विषयाची प्रार्थनेची शपथ घेण्यात आली. या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक एम.एच.चौधरी होते. यांनी संविधानबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमावेळी बी.आर. महाजन, ए.के. पाटील, जी.डी. महाजन, किरण महाजन, प्रकाश माळी, बी.डी. सुतार यांच्यासह शाळेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.