शेंदुर्णीत संविधान गौरव दिन आणि शहिदांना आदरांजली

शेंदुर्णी -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शेंदुर्णी येथील संविधान जागर समितीच्या वतीने संविधान गौरव दिन आणि २६/११ दहशतवादी हल्ल्यातील विरजवांनाना आदरांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी गोविंद अग्रवाल होते.कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून श्री उत्तम थोरात यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला देशाचे संविधान दिले ते फक्त संविधान नसून भारतीय लोकशाहीची जननी आहे. भारतीय राज्यघटना हे लोकाभिमुख करण्यासाठी आणि त्यांचे रक्षण करण्याची जबाबदारी प्रत्येक भारतीयांची आहे असे प्रतिपादन केले.

कार्यक्रमास अमृत खलसे, उत्तम थोरात, स्नेहदिप गरूड, सचिन कुमावत, तसेच सेवानिवृत्त सैनिक किरण गुजर, प्रवीण ठाकूर, सोपान वाडे, भानुदास गुजर, प्रताप घुले, राजू बारी, वासुदेव गुजर, विठ्ठल लोखंडे, साईदीप चव्हाण, नानासाहेब बारी यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ऍड किशोर बारी यांनी तर सूत्रसंचालन भागवत सपकाळे , कू.रंजना कुमावत यांनी केले. कार्यक्रमासाठी संजय गायकवाड, अमोल गुजर, विठ्ठल गरूड, भागवत सपकाळे, दिपक सुरडकर, हर्षल मांडोळे यांनी मेहनत घेतली.

Protected Content