भडगाव येथील भोगवटाधारकांना दिलासा : नरेंद्र पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

भडगाव प्रतिनिधी । भडगाव नगरपरीषद क्षेत्र अंतर्गत यशवंत नगर, कराब, टोणगाव, वडधे येथिल नागरिकांच्या हक्काच्या जागेला सिटीसर्वे लागू होण्यासाठी अनेक दिवसांपासून पाठपुरावा सुरू होता.  आता लवकरच नागरिकांच्या हक्काचे व स्वः मालकीचे घरकुल व बँक कर्ज कामे लवकरच मार्गी लागू शकणार असल्याची माहिती सामाजिक नरेंद्र पाटील यांनी पत्रकाद्वारे दिली.

भडगाव शहरातील यशवंत नगर, कराब, टोणगाव, वडधे येथिल नागरिक १९६९ पासून वास्तव्य करत असून त्यांना हक्काच्या जागा असूनही सिटी सर्वेला नोंद नसल्याने आजतागायत त्यांना शासनाच्या घरकुल, प्रधानमंत्री आवास योजना व इतर योजनांचा ठोस लाभ घेता येत नव्हता. शिवाय व्यवसाय व घर बांधकाम साठी बँक कर्जही मिळत नव्हते. अनेक शासकीय योजनांना मुकावे लागत होते. अनेक नागरिकांनी जीवनमान उंचावत नसल्याने आर्थिक व सामाजिक संकटात सापडून जीवन संपविले आहे. भोगवटाधारकाचा मृत्यु झाल्यानंतर त्याच्या कायदेशीर वारसांना त्याचा मालकी हक्कही मिळत नाही.

नागरिकांना सर्व योजनांचा तात्काळ लाभ मिळून, हक्काची जागा सिटीसर्वे लागावी या करिता २०१६ पासून शासनाच्या विविध विभाग कार्यालय अधिक्षक गावठाण जमाबंदी आयुक्त, पुणे, उपसंचालक भूमिअभिलेख, नाशिक, जिल्हा अधिक्षक भूमि अभिलेख, जळगाव, उपअधीक्षक भूमिअभिलेख भडगाव, नगरविकास विभाग मंत्रालय मुंबई, नगरविकास विभाग -२ मंत्रालय मुंबई, जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमिअभिलेख पुणे, जिल्हाधिकारी जळगाव, मुख्याधिकारी, न.पा. भडगाव यांच्याकडे नरेंद्र पाटील सातत्याने लेखी पाठपुरावा करत आहे. दरम्यान मागील वर्षी जनआंदोलन उभारून नागरिकांच्या सह्यांचे पत्र ही जिल्हाधिकारी यांना दिले होते.

काम मोठे असल्याने सर्वच कार्यालय एकमेकांना बोट दाखवण्यात वेळ घेत असल्याने त्यांच्या कडे नरेंद्र पाटील यांनी माहिती अधिकारात सह जळगाव जिल्हाधिकारी, आयुक्त नासिक , आयुक्त पुणे, सचिव मंत्रालय मुंबई , मुख्यमंत्री कार्यालय व थेट पंतप्रधान कार्याकाय यांच्या कडे थेट तक्रार दाखल केली आहे. त्याची दखल मुख्यमंत्री कार्यालय व संबंधित विभागाने घेऊन मंत्रालय कक्ष अधिकारी मा. उदयजी सार्दळ यांचे दि. १३ जानेवारी व २८ जानेवारी च्या पत्रा नुसार मा जिल्हाधिकारी जळगाव यांना लवकरात लवकर कार्यवाही ची विनंती केली असून येथील नागरिकांच्या समस्या प्रशासकीय स्तरातून लवकरच सुटणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे .

 

Protected Content