पुणे, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा – ‘सिल्वर ओक’ हल्ला प्रकरणी सातत्याने चर्चेत असलेल्या अॅड.सदावर्तेना यांना आज मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. पुण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात अड्.सदावर्तेना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे.
मराठा समाजाच्या आरक्षण संदर्भात अॅड.सदावर्ते यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केले, यावरून १ सप्टेंबर २०२० रोजी कात्रज येथील अमर रामचंद्र पवार यांनी फिर्याद दिली होती. त्यानुसार भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात अड्.सदावर्ते यांच्या विरोधात गुन्हा दाखल आहे. अड्. गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा समाजाविरोधात आक्षेपार्ह विधान केले होते. याबाबत सदावर्तेंवर २०२० मध्ये दाखल असलेल्या गुन्ह्याप्रकरणी ताबा मिळवण्यासाठी पुणे पोलिसांनी अर्ज देखील केला असून पडताळणी करण्यासाठी त्यांच्या आवाजाचे नमुने घेणे आवश्यक असल्याचे राज्य सरकारकडून उच्च न्यायालयात सांगण्यात आले आहे.
परंतु, यापूर्वी देखील सातारा पोलिसांनी याच संदर्भात दाखल अन्य गुन्ह्यात अड्.सदावर्तेंच्या आवाजाचे नमुने घेतलेले आहेत. त्यामुळे आता पुन्हा नव्याने त्यांच्या आवाजाचे नमुने घेण्याची गरज काय? असा प्रश्न न्यायालयाकडून विचारण्यात आला होता. त्यानुसार २५ हजारांच्या जातमुचलक्यावर सुटका करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. त्यांनंतर कोल्हापूर पोलीस अड्. सदावर्तेंना घेऊन ऑर्थर जेलकडे रवाना झाले आहेत.