जळगाव, प्रतिनिधी | जळगाव शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी यांनी आज (दि.३) जळगाव शहर विधानसभा मतदार संघासाठी आपला अपक्ष उमेदवारी दाखल केला आहे.
मित्र मंडळी, हितचिंतक, पदाधिकारी यांच्याशी सल्ला मसलत करून त्यांनी आपली उमेदवारी जाहीर केली आहे. दरम्यान, काँग्रेस आघाडीतर्फे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अभिषेक पाटील यांची या मतदार संघासाठी अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. असे असतांंना डॉ. चौधरी यांनी अर्ज दाखल करून एकप्रकारे बंडखोरी केली आहे. तेव्हा त्यांच्यासोबत माजी आमदार शरद वाणी यांचे सुपुत्र चंद्रशेखर शरद वाणी, अॅड. ऋषेकेश सोनवणे, डॉ. प्रीतम पवार, व्यावसायिक निलेश लढ्ढा, विनोद निकम, फरहान शेख, अनिल सूर्यवंशी, सुयश जाधव, विशाल पाटील, डॉ. नरेंद्र पाटील यांच्यासह ‘जळगाव फर्स्ट’चे समर्थक उपस्थित होते.